जबाबदारीची रुजवण करणारा प्रभावी उपक्रम : ‘वर्ग नियम’

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले वर्ग नियम
महाराष्ट्र : (दिनांक : २९ डिसेंबर २०२५)

मूल्यवर्धन अंतर्गत
वर्ग नियम बनवणे हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी वर्गात तयार केले जाणारे सकारात्मक व कृतीयुक्त नियम हे शिक्षक व विद्यार्थी मिळून निश्चित करतात आणि पाळतात. यामुळे अध्ययन–अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होते तसेच विद्यार्थ्यांमध्ये नकळत मूल्यांची जाणीव निर्माण होते.
असे नियम म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः चर्चेतून तयार केलेले वर्ग नियम होत. हे नियम शिक्षणासोबतच शिस्त, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजविण्यास मदत करतात.

वर्ग नियमांची प्रमुख वैशिष्ट्ये :

विद्यार्थ्यांचा सहभाग: नियम शिक्षकांकडून लादले जात नाहीत, तर विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडूनच तयार केले जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थी हे नियम स्वेच्छेने स्वीकारून पाळतात.

सकारात्मक भाषा: नियम मांडताना ‘करू नका’ याऐवजी ‘करा’ अशा सकारात्मक शब्दांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ‘शांतता ठेवूया’ ऐवजीशांतता पाळूया’ असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जातो.

कृती-आधारित अंमलबजावणी: नियमांचे पालन केवळ सांगण्यापुरते न राहता कृतीतून केले जाते, ज्यामुळे मूल्ये प्रत्यक्ष आचरणात उतरतात.

सर्वांगीण विकास: या प्रक्रियेतून केवळ शैक्षणिक विकासच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक कौशल्यांचा विकास, जबाबदारीची जाणीव तसेच नैतिक मूल्यांची रुजवण साधली जाते.

उदाहरणार्थ: वर्गात प्रवेशाचे नियम, गृहपाठ पूर्ण करण्याचे नियम, सहाध्यायांशी व शिक्षकांशी कसे वागावे यासंबंधीचे नियम इत्यादी, हे सर्व नियम विद्यार्थी व शिक्षक मिळून एकत्रितपणे ठरवले जातात.

वर्ग नियम हा उपक्रम प्रभावीपणे राबवत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले वर्ग नियम

  1. श्रीराम विद्यालय, चिचगड (ता. देवरी, जि. गोंदिया)
  2. महात्मा फुले विद्यानिकेतन (ता. देवरी, जि. गोंदिया)
  3. जि. प. प्राथमिक शाळा, सेजगांव (जि. गोंदिया)
  4. राहुल प्राथमिक शाळा, आमगाव (जि. गोंदिया)
  5. सिद्धार्थ हायस्कूल, डवकी, (ता. देवरी, जि. गोंदिया)
  6. जि. प. शाळा, आगवन शिशुपाडा (ता. डहाणू, जि. ठाणे)- इयत्ता चौथी
  7. जिल्हा परिषद शाळा, आगवन शिशुपाडा, (ता. डहाणू, जि. ठाणे)- इयत्ता दुसरी
  8. जनकल्याण शिक्षण संस्था, हरंगुळ बु. (ता. जि. लातूर)
  9. जिल्हा परिषद शाळा, सोनुर्ली (ता. यवतमाळ)
  10. जि. प. प्रा. शाळा, गायडोंगरी (ता. सावली, जि. चंद्रपूर)
  11. जि. प. प्रा. शाळा, फुलचूर (जि. गोंदिया)
  12. जि. प. उच्च प्रा. शाळा, शेरज बु. (ता. जीवटी, जि. चंद्रपूर)