
नागपूर जिल्हा मूल्यवर्धन ३.० DRG प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक
शासकीय शिक्षकांच्या अभूतपूर्व प्रशिक्षणाचे SCERT ने पेलले शिवधनुष्य (दि. १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT, Maharashtra) आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (Shantilal Muttha Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील निवडक शिक्षकांचे (राज्य संसाधन गट- SRG) प्रशिक्षण दि. १६ जून ते १८ जुलै दरम्यान यशस्वीपणे संपन्न झाले. त्यानंतर दि. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित १०,७२८ जिल्हा शिक्षकांच्या ‘मूल्यवर्धन ३.०’ (जिल्हा संसाधन गट- DRG) प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सर्व ३६ जिल्ह्यांतील DRG शिक्षकांसाठी एकूण २६६ बॅचेसमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
✅ प्रशिक्षण पूर्ण- १३ जिल्हे, एकूण २६७८ DRG प्रशिक्षक
(नागपूर, रत्नागिरी, पालघर, अकोला, भंडारा, वाशिम, कोल्हापूर, नंदुरबार, मुंबईशहर, सिंधुदुर्ग, हिंगोली, परभणी, गोंदिया)
🔄 प्रशिक्षण सुरू- १२ जिल्हे, एकूण १८७४ DRG प्रशिक्षक
(नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, सांगली, जळगाव, अहमदनगर, वर्धा, सातारा, रायगड, धुळे)
📅 प्रस्तावित प्रशिक्षण (१८ ते २१ ऑगस्ट २०२५)- ११ जिल्हे, एकूण ४२७६ DRG प्रशिक्षक
(मुंबई उपनगर, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर)
दि. २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील १०७२८ DRG प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘मूल्यवर्धन ३.०’ हा ऐतिहासिक कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- NEP २०२०, राष्ट्रीय शैक्षणिक कृती आराखडा NCF- २०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ यांच्याशी सुसंगत असून, हा मूल्यवर्धनच्या विकासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
#Mulyavardhan #ValueEducation #MSCERT #SMF #TeacherTraining #EducationTransformation #MaharashtraEducation #TransformingEducation #NEP2020