Banner

शिक्षक हेच मूल्यवर्धनचे खरे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’!

मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल शिक्षिका गायत्री सुभाष पाटील यांनी मत व्यक्त केले आहे...
मूल्यवर्धनचे जुने प्रेरक किंवा शिक्षक भेटले, की या कार्यक्रमाविषयी ते तळमळीनं बोलतात. तेव्हा जाणवतं, की मूल्यवर्धनचं हेच खरं यश आहे! जि. प. प्राथमिक शाळा भोजे (केंद्र पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील शिक्षिका सौ. गायत्री सुभाष पाटील यांनी असाच प्रेरणादायी अनुभव शब्दबद्ध केला आहे.
“आज आपणास भेटून खूप आनंद झाला. तब्बल सहा वर्षानंतर तुमची गाठभेट झाली. २०१९ मध्ये आपल्याकडून मिळालेल्या मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे अनुभव अजूनही गाठीशी आहेत. तुमच्यासारख्या राज्यस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीने माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला स्मरणात ठेवले याच गोष्टीचे मला जास्त आश्चर्य वाटलं. आपणाकडून मला नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असते. या वेळेला मी प्रेरक म्हणून जरी मूल्यवर्धन परिवारासोबत नसली तरी आपल्या मार्गदर्शनाची आणि प्रेरणेची मला नेहमीच गरज भासेल. प्रशासनापेक्षाही आम्हाला मुथ्था फाउंडेशन सोबत काम करताना खूप चांगला अनुभव आला. तळमळीने शिकवणारे शिक्षक आणि तळागळाला असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे मुथ्था फाउंडेशनची धडपड या साऱ्यामुळेच एनर्जी मिळून जाते. मूल्य ही तर आपल्या संस्कृतीचा पायाच आहेत. आणि त्यासाठी नियमितपणे जाणीवपूर्वक काम करणे ही आमची ड्युटी आहे.”