Banner

‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा प्रेरणादायी अनुभव!

नांदेड जिल्हा मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक
नुकतेच नांदेड येथे जिल्हास्तरीय मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेले साहेबराव शेळके (मुख्याध्यापक, स्वामी रामानंद तीर्थ प्रा.शा., नवा मोठा, त्रिरत्ननगर-सांगवी, नांदेड) यांनी या मूल्यवर्धन प्रशिक्षणासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

७० हजार शिक्षकांच्या ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा टप्पा पार!

पालघर जिल्ह्यातील तालुकास्तरीय प्रशिक्षण केंद्र, कोटबी बहुजडापा केंद्रातील सहभागी शिक्षक!
शासनाच्या शिक्षण विभागाची शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटना 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर शिक्षकांचे तालुकास्तरीय ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.

शिक्षक हेच मूल्यवर्धनचे खरे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’!

मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल शिक्षिका गायत्री सुभाष पाटील यांनी मत व्यक्त केले आहे...
मूल्यवर्धनचे जुने प्रेरक किंवा शिक्षक भेटले, की या कार्यक्रमाविषयी ते तळमळीनं बोलतात. तेव्हा जाणवतं, की मूल्यवर्धनचं हेच खरं यश आहे! जि. प. प्राथमिक शाळा भोजे (केंद्र पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील शिक्षिका सौ. गायत्री सुभाष पाटील यांनी असाच प्रेरणादायी अनुभव शब्दबद्ध केला आहे.

नवे विचार, नवी दिशा! गटात मिळते शिकण्याची मजा!!

नाशिकच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील मूल्यवर्धन उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी
आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल होताना दिसून येत आहेत. हरहुन्नरी शिक्षकाला ही आव्हाने संधीच वाटते. असा आलेला अनुभव स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर, नाशिक या शाळेतील शिक्षक श्री. योगेश पुंडलिकराव कड यांनी सांगितला आहे.

‘मूल्यवर्धन’मधून उमललेले नियम: शाळेपासून ते घरापर्यंत

सिलवासा तालुक्याच्या ‘प्राथमिक शाळा कमळीफळीया’ येथील विद्यार्थी एका मूल्यवर्धन उपक्रमादरम्यान
लहान मुलांना संधी दिली, त्यांना प्रोत्साहन दिलं, तर त्यांच्या मनातल्या कल्पनांना नक्कीच पंख फुटतात. ते निर्भयपणे आपल्या कल्पना सर्वांसमोर मांडतात. असाच काहीसा अनुभव दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील एका शाळेत आला. त्या शाळेचे नाव आहे प्राथमिक शाळा कमळीफळीया.’

गोवा: विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने सरकारी शाळांमध्ये सकारात्मक बदल

मूल्यवर्धनच्या एका उपक्रमात सहभागी झालेले सरकारी प्राथमिक शाळा, विठ्ठलपूर या शाळेचे विद्यार्थी
२०१६ पासून गोवा राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. २०२५-२६ या शैक्षणिक मूल्यवर्धन ३.० राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत, वर्तनात, शिस्तीत, स्वच्छतेत आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेत मोठे बदल झाले आहेत. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधील परस्पर संवाद वाढला आहे. सकारात्मक बदल झालेली ही काही शाळांची उदाहरणे...

मूल्यवर्धन ३.० - जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद

नागपूर जिल्हा मूल्यवर्धन ३.० DRG प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक
शासकीय शिक्षकांच्या अभूतपूर्व प्रशिक्षणाचे SCERT ने पेलले शिवधनुष्य (दि. १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT, Maharashtra) आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (Shantilal Muttha Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील निवडक शिक्षकांचे (राज्य संसाधन गट- SRG) प्रशिक्षण

पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील शिक्षकांचे (जिल्हा संसाधन गट) प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण!

पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील एकूण १८३९ शिक्षकांचे ४६ बॅचेसद्वारे प्रशिक्षण पूर्ण
विद्यार्थीकेंद्रित, ज्ञान रचनावादावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात २०१५ ते २०२० दरम्यान यशस्वीपणे राबविला गेला आहे. या शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत मूल्यवर्धन ३.०’ या नव्या स्वरुपात राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.