राज्यात ‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टीम सज्ज!

पुणे: जिल्हा व तालुका समन्वयकांसह मूल्यवर्धन टीम
(दिनांक : २९ ऑक्टोबर २०२५)

DPC व TC यांचे विशेष प्रशिक्षण अंतिम टप्प्यात...

‘मूल्यवर्धन ३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील जिल्हा व तालुका समन्वयकांचे पाच दिवसीय प्रशिक्षण दोन टप्प्यात आयोजित केले आहे.

  • पहिला टप्पा दि. १३-१७ ऑक्टोबर दरम्यान पुणे, बीड, नाशिक येथे संपन्न
  • दूसरा टप्पा दि. २७-३१ ऑक्टोबर दरम्यान पुणे, अमरावती, चंद्रपूर येथे सुरू

या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट, टप्पे आणि मार्च २०२६ पर्यंतची ध्येये समजून घेणे, तसेच अहवाल प्रणाली अधिक मजबूत करणे, शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय वाढविणे आणि तालुका व जिल्हास्तरावरील नियोजन व आढावा यंत्रणा प्रभावीपणे राबविणे जेणेकरुन शिक्षक ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाची अंमलबजावणी वर्ग पातळीवर प्रभावीपणे करू शकतील, हा आहे.

या अनुषंगाने दुसर्‍या टप्प्यातील एका बॅचच्या प्रशिक्षणास बीजेएस कॉलेज, वाघोली, पुणे येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यामध्ये सहा जिल्ह्यातील ११० समन्वयक उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान एसएमएफचे कार्यकारी संचालक व्ही. वेंकटरमना आणि एसएमएमएफचे मार्गदर्शक श्री. विद्याधर शुक्ल यांनी टीमला मार्गदर्शन केले. तसेच राज्यभरातील सर्व शाळांमध्ये ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रम परिणामकारकपणे राबविला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.