![]() |
| तक्रार व कौतुक पेटीत सूचना टाकताना शाळेतला विद्यार्थी |
महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६)
आठवड्याला विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव लिहून त्याने काय प्रेरणादायी कार्य केले आहे, त्यावरून त्याच्या कौतुकाची चिठ्ठीही विद्यार्थी त्याच पेटीत टाकतात. मग आठवड्याच्या दर शनिवारी ही पेटी सर्व विद्यार्थ्यांसमोर उघडली होते आणि सूचनांवर उपाय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक पुष्पगुछ देऊन केले जाते.
मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या अगोदर फक्त तक्रार लिहूनच पेटीत टाकली जायची; परंतु मूल्यवर्धन उपक्रमांमधून प्रेरणा घेत उत्तम कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे, त्यांचा सन्मान व्हावा, ही युक्ती शिक्षकांनी सुरु केली. त्यामुळे विद्यार्थी अतिशय उत्तमपणे आपल्या सूचना देत आहेत. त्यांचा वर्तनात परिवर्तन होत आहे, असे शाळेचे शिक्षक सांगतात.
शाळेने राबविलेली ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे निदर्शनात आले.
