Banner

७० हजार शिक्षकांच्या ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षणाचा टप्पा पार!

पालघर जिल्ह्यातील तालुकास्तरीय प्रशिक्षण केंद्र, कोटबी बहुजडापा केंद्रातील सहभागी शिक्षक!
शासनाच्या शिक्षण विभागाची शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटना 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT), जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर शिक्षकांचे तालुकास्तरीय ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.
राज्यातील ३,३७,०६७ शिक्षकांपैकी तब्बल ७०,६०२ शिक्षकांनी आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले असून, आगामी काळात तब्बल साडेतीन लाखांपेक्षा जास्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. विशेष बाब म्हणजे, राज्यातील शिक्षकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद आणि कृतीशील सहभाग हे या प्रशिक्षणाचे खास वैशिष्ट्य होय.
State Resource Group (SRG) प्रशिक्षकांकडून District Resource Group (DRG) प्रशिक्षकांनी घेतलेल्या प्रभावी प्रशिक्षणानंतर, तालुका/ब्लॉक स्तरावर राज्यभरातील शिक्षकांना क्लस्टर/ब्लॉक पातळीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या वर्षापासून सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर आता जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण वेगाने सुरू आहे.