Banner

मूल्यवर्धन: मूल्यांतून संस्कारांकडे... एक नवी वाटचाल!

उपशिक्षिका व DRG केतकी संखे आणि विद्यार्थी...

जि. प. शाळा धाकटी डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथील शाळेच्या उपशिक्षिका तसेच मूल्यवर्धनच्या जिल्हा संसाधन सदस्य (DRG) केतकी संखे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान त्यांच्या शाळेचा मूल्यवर्धन ३.० च्या अंमलबजावणीचा अहवाल तयार केला आहे. हा संपूर्ण अहवाल खाली सादर करत आहोत, जरूर वाचा...

मूल्यवर्धनमधील विद्यार्थी मूल्यांकन

 

मूल्यवर्धन पुस्तिकेतील मूल्यांकन पानाची झलक

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातून मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना त्यातील मूल्यांकन प्रक्रिया दिशादर्शक ठरते. हे मूल्यांकन कसे करावे, याचा सखोल वेध या लेखात घेतला आहे. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी शिक्षकांना उपयोगी पडेल अशी मूल्यवर्धनमधील मूल्यांकनाची प्रक्रिया सोप्या उदाहरणांसह मांडली आहे.

मुलांना आपल्याशा वाटणार्‍या मूल्यवर्धन पुस्तिकांचे अंतरंग

इयत्ता पहिलीच्या मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेची झलक


महाराष्ट्र (दि. ११ मार्च २०२६)

संविधानाच्या वाटेवर चिमुकली पाऊले

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही संविधानात असलेली मोठमोठी मूल्ये आहेत. मग लहान मुलांच्यात ती रुजवणं तरी शक्य आहे का? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. या प्रश्नाच्या उत्तराची वाट मूल्यवर्धन उपक्रम दाखवतात. या वाटेवर मुलांच्या स्व-जाणीव, वैयक्तिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि सामाजिक जबाबदार्‍या या क्षमता विकसित होत जातात. इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी ही वाट कशी सोपी होते? हे जाणून घेऊया श्री. विद्याधर शुक्ल, उपसंचालक (सेवानिवृत्त), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि सल्लागार, शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन, पुणे यांच्या विचारातून. 

 

पहिलीची उपक्रम पुस्तिका

मूल्यवर्धन ‘विद्यार्थी उपक्रम पुस्तिका’ मुलांना आपलीशी वाटते. शिक्षकांची वाट न पाहता ती उत्साहाने उपक्रमांच्या रंगीबेरंगी बागेत पूर्ण फेरफटका मारतात. कविता म्हणणं, चित्र काढणं, प्रसंगचित्रांचं निरीक्षण, घरी पालक आणि शेजाऱ्यांशी गप्पागोष्टी इत्यादी आवडत्या कृती करताना मुलांची पुस्तिकांशी मैत्री जमत जाते. ही गंमत अनुभवताना ती क्षमतांच्याही पायऱ्या कशा चढत जातात, ते काही उदाहरणांतून पाहूया.

 

स्व-जाणीव

स्वतःची ओळख ही साऱ्या क्षमतांच्या विकासाची वाट तयार करते. असे काही उपक्रम पाहूया.

  • माझा परिचय' या उपक्रमात मुलं कवितेतून आपलं नाव आणि आवड सांगून स्व-जाणिवेच्या दालनात पाऊल टाकतात.
  • आम्ही करू शकतो' या उपक्रमात रोजच्या दिनचर्येतल्या कोणकोणत्या गोष्टी करता येतात, त्या गोष्टी मुलं ओळखतात. आपल्याला येणाऱ्या इतरही गोष्टी सांगतात.
  • माझी शाळा' या उपक्रमात स्व-जाणिवेचा परीघ आणखी वाढतो. मुलं पुस्तिकेत आपल्या शाळेचं चित्र काढतात. शाळेबद्दलची माहिती घरच्यांना सांगतात.
  • आनंद' या उपक्रमातील गाणे म्हणताना आपले छंद आठवतात.
  • राग आला की’ या उपक्रमात प्रसंगचित्रे पाहून त्यात मुलांना राग आवरण्याच्या कृती ओळखायला मिळतात.

 

वैयक्तिक जबाबदाऱ्या

या विभागातले उपक्रम घरी किंवा बाहेर वावरताना नियम का पाळले पाहिजेत, या विषयीच्या जबाबदार्‍यांची जाणीव मुलांना करून देतात. असे काही उपक्रम पाहूया.

  • आपल्या वर्गाचे नियम या उपक्रमातले गाणे म्हणताना वर्गात कसं वागलं पाहिजे, कसं वागू नये याची जाणीव मुलांना होते.
  • स्वतःची काळजी या उपक्रमात मुलं कविता म्हणतात. प्रसंगचित्रे पाहून स्वच्छतेच्या चांगल्या-वाईट सवयी ओळखतात. घरच्यांशी बोलून चांगल्या सवयींची यादी करतात.
  • योग्य की अयोग्य या उपक्रमात मुलं भावंडांशी आणि इतर मित्र-मैत्रिणींशी कोणतं वागणं योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे, याविषयी विचार करायला शिकतात.

 

नातेसंबंध

हा विभाग मुलांना कुटुंब आणि समाजाची ओळख करून देतो. त्यापैकी काही उपक्रम पाहूया.

  • माझे कुटुंब या उपक्रमात कुटुंबाविषयीचे गाणे मुले म्हणतात. आपल्या घरी कोणकोण आहेत, त्यांची चित्रंही पुस्तिकेत काढतात. आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहेत, हे घरच्यांना सांगतात.
  • मदत करणारे मित्र या उपक्रमात एकमेकांना मदत केल्याचे प्रसंग मुले आठवतात. घरातील व्यक्तींना त्यांच्या मित्रांनी त्यांना कोणती मदत केली, याविषयी विचारतात.
  • इतरांच्या भावना या उपक्रमात निरनिराळ्या प्रसंगचित्रातील व्यक्तींना काय वाटत असेल, हे जाणून घेण्याची आणि व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळते.

 

सामाजिक जबाबदाऱ्या

सामाजिक जबाबदाऱ्या हा विभाग समाजात वावरताना असणाऱ्या निरनिराळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव मुलांना करून देतो. त्यापैकी काही उपक्रम पाहूया.

  • माझ्या घराचा परिसर या उपक्रमामध्ये आपलं घर आणि परिसराचं चित्र पुस्तिकेमध्ये काढतात, त्यांची नावं लिहितात.  
  • प्राणी आणि पक्षी यात काही प्राणी आणि पक्षी यांची चित्र पुस्तिकेत काढतात, त्यांची नावं लिहितात.  
  • प्राण्यांची आणि पक्षांची काळजी यामध्ये ‘आम्ही झाडे झुडपे वेली’ हे गाणं म्हणतात. कोणत्या चित्रात प्राण्यांची काळजी घेतली जाते ते ओळखतात.
  • पाण्याचा वापर ‘वाया घालवू नका कोणी’ हे गाणं म्हणतात. पाण्याचा वापर कोठे कोठे होतो ते आठवून त्या कृतींची चित्रे काढतात.

 

पुढच्या इयत्तांच्या पुस्तिका अशाच आहेत का?

होय, पुढच्या इयत्तांच्या पुस्तिकाही अशाच आहेत. मात्र मुलांचे वय जसे वाढते तसे त्यांचे विचार, भावना बदलतात. हे ध्यानात घेऊन त्यांना आवडतील, संविधानाच्या वाटेवर त्यांची पावले आणखी पुढे पडतील, असे उपक्रम त्यात आहेत. त्याही पुस्तिका वाचूया आणि याचा अनुभव घेऊया.

मूल्यवर्धन उपक्रमातून बहुलतावादाची पायाभरणी

बहुलतावादाची संकल्पना आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रमातील त्याचे शैक्षणिक महत्त्व

महाराष्ट्र, (दिनांक: १६ फेब्रुवारी २०२६)

प्रस्तावना :

शिक्षणातून बहुलतावादाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवता येतील आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रम या प्रक्रियेला कसे बळ देतात, याचा सखोल वेध या लेखात घेतला आहे. शालेय स्तरावर विविधतेचा स्वीकार, सहिष्णुता आणि परस्पर आदरभाव विकसित करण्यासाठी उपक्रमाधारित शिक्षणाची भूमिका येथे स्पष्ट केली आहे. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी बहुलतावादाची संकल्पना आणि ‘मूल्यवर्धन’ उपक्रमातील त्याचे शैक्षणिक महत्त्व सोप्या उदाहरणांसह मांडले आहे.

बेलदारवाडी शाळेतील शिक्षकाची ‘मूल्यवर्धन फाईल’ ठरतेय कौतुकास्पद!

बेलदारवाडीचे (जि. सांगली) शिक्षक राजाराम काटवटे यांची मूल्यवर्धन फाईल
महाराष्ट्र, (दिनांक: ९ फेब्रुवारी २०२६)

‘बेलदारवाडी’हीसांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात डोंगराळ भागात एक छोटी वाडी आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील मूल्यवर्धन शिक्षक राजाराम काटवटे यांनी ‘मूल्यवर्धन फाईल’तयार केली आहे. सदरील फाइलमध्ये सन २०२५-२०२६ वर्षासाठी मूल्यवर्धन तासिकेत कोणते कोणते उपक्रम घेतले याची तपशीलवार नोंद ठेवतात. त्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची सही असते. तसेच शेरा द्यायचा असल्यास त्यासाठीही एक स्वतंत्र कॉलम सोडलेला आहे.

‘मूल्यवर्धन ३.०’ पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणास अभूतपूर्व प्रतिसाद; ३५ जिल्ह्यांतल्या ४६४ शाळांमध्ये SMF तर्फे झाले सर्वेक्षण

शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित मूल्यवर्धन ३.० पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणातील काही क्षणचित्रे
महाराष्ट्र, (दिनांक: ५ फेब्रुवारी २०२६)

राज्यातल्या शाळांमध्ये सुरू असलेल्या मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावी, व्यापक व्हावी तसेच दीर्घकालीन परिणाम मूल्यांकनाची पायाभरणी करण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात महत्त्वाकांक्षी राज्यव्यापी पायाभूत मूल्यांकन सर्वेक्षणाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. ३५ जिल्हे व ५८ तालुक्यातल्या मराठी व उर्दू माध्यमांच्या ४६४ शाळांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणास सहभागी सर्वच घटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

‘तक्रार पेटी’च ‘कौतुक पेटी’ होते तेव्हा... मूल्यवर्धन कार्यक्रम प्रशिक्षणानंतर झालेला बदल…

तक्रार व कौतुक पेटीत सूचना टाकताना शाळेतला विद्यार्थी
महाराष्ट्र, (दिनांक: २३ जानेवारी २०२६)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्डीले वस्ती, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर या शाळेत शिक्षकांनी केलेल्या एका उपक्रमाची चर्चा आणि कौतुक होत आहे. त्यांनी एक ‘तक्रार’ व ‘कौतुक’ पेटी तयार करून ती पेटी शाळेत बसविली आहे. जे विद्यार्थी आपल्या काही सूचना, तक्रारी शिक्षकांना सांगू शकत नसतील, तर ते स्वत: चिठ्ठी लिहून या पेटीत टाकतात.

गप्पा मारूया, सारे शिकूया!

वर्गातील सहयोगी शिक्षणाचा एक प्रसंग (AI Photo)
महाराष्ट्र : (दिनांक : ८ जानेवारी २०२६)

प्रस्तावना :  मूल्यवर्धन उपक्रमांतील सहयोगी अध्ययन पद्धतींनुसार मुले गटात काम करता करता कितीतरी लोकशाही मूल्ये सहजपणे रुजू शकतात. याची जाणीव शिक्षक बंधु-भगिनींना, शालेय व्यवस्थापन समितीला कशी करून देता येईल याची दिशा या लेखात मिळेल. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी ही सहयोगी अध्ययन प्रक्रिया उलगडण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा एक काल्पनिक प्रसंग वापरला आहे.