Banner

गोवा राज्याचा ऐतिहासिक निर्णय; सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये ‘मूल्यवर्धन ३.०’

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सोबत श्री. शांतिलाल मुथ्था, श्री. गोविंद पर्वतकर, श्री. शैलेश झिंगडे, श्री. मनोज सावईकर
गोवा : २०१६ पासून गोवा राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व शासकीय शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. आता या शैक्षणिक वर्षापासून सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ कार्यक्रम राबविण्यात येणार असून या साठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला सहकार्य करणार आहे.

राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी ऑनलाइन संवाद साधत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. (दि. १२ जुलै २०२५) या वर्षीपासून पहिली ते आठवीच्या १,४३३ शाळांमधून, २,७३९ शिक्षकांच्या सहभागाने तब्बल १,६१,२६२ विद्यार्थ्यांपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा पोहोचणार असून या साठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला सर्व सहकार्य करणार आहे.

या प्रसंगी गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. गोविंद पर्वतकर, शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री. शैलेश झिंगडे, उपशिक्षण संचालक श्री. मनोज सावेकर आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे श्री. शांतिलाल मुथ्था उपस्थित होते.