Banner

डॉ. राहूल रेखावार यांच्या शुभहस्ते ‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन

उद्घाटन प्रसंगी एससीईआरटीचे संचालक डॉ. राहूल रेखावार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था आणि इतर मान्यवर
महाराष्ट्र
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Maharashtra) आयोजित चौथ्या टप्प्यातील शिक्षकांच्या (राज्य संसाधन गट)- (SRG- State Resource Group) राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन SCERT Maharashtra चे संचालक डॉ. राहूल रेखावार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला समता विभागाच्या प्रमुख सौ. वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, फाउंडेशनचे श्री. विद्याधर शुक्ला, श्री. अशोक गोपाल, श्रीमती मीनल दशपुत्रे यांसह बीड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पालघर या नऊ जिल्ह्यांतून आलेले शिक्षक आणि मूल्यवर्धन मास्टर ट्रेनर्स उपस्थित होते. राज्यातील निवडक शिक्षकांचे (SRG) ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण दि. १६ जून ते १८ जुलै दरम्यान एकूण पाच टप्प्यात संपन्न झाले.