Banner

गप्पा मारूया, सारे शिकूया!

वर्गातील सहयोगी शिक्षणाचा एक प्रसंग (AI Photo)
महाराष्ट्र : (दिनांक : ८ जानेवारी २०२६)

प्रस्तावना :  मूल्यवर्धन उपक्रमांतील सहयोगी अध्ययन पद्धतींनुसार मुले गटात काम करता करता कितीतरी लोकशाही मूल्ये सहजपणे रुजू शकतात. याची जाणीव शिक्षक बंधु-भगिनींना, शालेय व्यवस्थापन समितीला कशी करून देता येईल याची दिशा या लेखात मिळेल. एससीईआरटी, पुणे या संस्थेचे सेवानिवृत्त उपसंचालक श्री. विद्याधर शुक्ल यांनी ही सहयोगी अध्ययन प्रक्रिया उलगडण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा एक काल्पनिक प्रसंग वापरला आहे. 

मूल्यधिष्टीत शिक्षणातून घडणारी ‘संवेदनशील’ पिढी!

मूल्यवर्धन- जि.प.प्रा.शाळा, कलमठ- गावडेवाडीचे विद्यार्थी
महाराष्ट्र : (दिनांक : ५ जानेवारी २०२६)

मूल्यधिष्ठित शिक्षणातून मुलांच्या मनात करुणा, सहवेदना आणि माणुसकी कशी रुजते, याचा हृदयस्पर्शी अनुभव सहशिक्षिका सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांनी आपल्या शब्दांत मांडला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलमठ गावडेवाडी (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील त्यांच्या वर्गातील हा छोटासा प्रसंग मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सामर्थ्य उलगडून दाखवतो.

जबाबदारीची रुजवण करणारा प्रभावी उपक्रम : ‘वर्ग नियम’

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले वर्ग नियम
महाराष्ट्र : (दिनांक : २९ डिसेंबर २०२५)

मूल्यवर्धन अंतर्गत
वर्ग नियम बनवणे हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी वर्गात तयार केले जाणारे सकारात्मक व कृतीयुक्त नियम हे शिक्षक व विद्यार्थी मिळून निश्चित करतात आणि पाळतात. यामुळे अध्ययन–अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होते तसेच विद्यार्थ्यांमध्ये नकळत मूल्यांची जाणीव निर्माण होते.

कृष्णाने स्वतःबद्दल लिहिली सुंदर कविता; शिक्षक-पालकांकडून झाले कौतुक

जि. प. शाळा, झेंडेवाडी येथील विद्यार्थाने लिहिलेली सुंदर कविता

महाराष्ट्र : (दिनांक : १७ डिसेंबर २०२५)

मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्व-जाणीव, आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता विकसित होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून तिसरीच्या विद्यार्थ्याच्या कवितेतून हे प्रभावीपणे समोर आले आहे. मग त्याचे शिक्षक-पालकांकडून खूप खूप कौतुक झाले.

मूल्यवर्धन: पालकांशी हितगूज

शाळेत पालकांशी हितगुज करताना शिक्षक
महाराष्ट्र : (दिनांक : १५ डिसेंबर २०२५)

‘सहयोगी अध्ययन’ हा सर्वच मूल्यवर्धन उपक्रमातील अध्य‌यन-अध्यापन पद्धतीचा गाभा आहे. सह‌योगी अध्य‌यनामुळे मुलांना आणि शिक्षकांनाही कोणकोणते फायदे होतात, तसेच मूल्यविकास आणि लोकशाहीवृत्ती विकसनासाठी योग्य दिशा मिळते. एससीईआरटीचे सेवानिवृत्त उपसंचालक तथा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे सल्लागार श्री. विद्याधर शुक्ल यांनी हे एका वास्तव आणि कल्पिताचे मिश्रण असलेल्या उदाहरणातून उलगडून दाखवले आहे.

कल्पक-नाविन्यपूर्ण उपक्रमांनी ‘संविधान दिन’ साजरा; राज्यातील शाळांचा अभूतपूर्व प्रतिसाद!

विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारलेली अक्षरं (विकास विद्यालय विहीरगाव, ता. सावली जि. चंद्रपूर)
महाराष्ट्र : (दिनांक : ८ डिसेंबर २०२५)

एखादा कार्यक्रम किंवा उपक्रम हा नाविन्यपूर्ण कल्पनांची जोड देऊन सर्वांच्या सहभागाने राबविला तर तो उपक्रम लोकप्रिय होतोच शिवाय त्याचा मुख्य उद्देशही साध्य होतो. असाच काहीसा अनुभव या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये राबविलेल्या संविधान दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. संविधानाशी संबंधित विविध ९ उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात हा दिवस शाळांमध्ये साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी सहकार्य केले.

मूल्यवर्धन: विद्यार्थ्यांना संवेदनशील व मूल्याधिष्ठित नागरीकत्वाचे धडे!

मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या एका उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी
महाराष्ट्र : (दिनांक : २ डिसेंबर २०२५)

२०१५ पासून राज्यातील शासकीय शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. या वर्षीपासून शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी या वर्गांसाठी हा कार्यक्रम नव्याने सुरू झालेला आहे. मूल्यवर्धन शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र शंकर लाड (विद्या मंदिर वालूर, केंद्र वारूळ, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी आपली भूमिका सदरील लेखातून मांडलेली आहे.

महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण

केज येथील मूल्यवर्धन ३.० प्रशिक्षणात सहभागी झालेले बीड जिल्ह्यातील शिक्षक
डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणी
महाराष्ट्र : (दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५)

महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १,९३,३७० शिक्षकांनी सदरील प्रशिक्षण पूर्ण केले असून या शिक्षकांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.